मंगळवार, १७ जुलै, २०१२

गिधाडे काय शिकवणार आपल्याला?


हे छायाचित्र आफ़्रिकेच्या एका भीषण दुष्काळ व उपासमारीच्या कालखंडातले आहे. ते इवले कुपोषणाने खंगलेले बालक मृत्य़ूच्या जबड्यात रांगत चालले आहे आणि त्याच्या मरणाचीही प्रतिक्षा न करता त्याचा घास ध्यायला टपलेले गिधाड त्यात दिसते आहे. गुवाहाटीच्या तरूण मुलीवर जो प्रसंग ओढवला त्याचे चित्रण व प्रक्षेपण करणार्‍यांना तिला सोडवावे वाटले नाही तर त्यात त्यांनी सनसनाटी बातमी शोधली. कमीअधिक प्रमाणात सर्वच वाहिन्यांची पत्रकारीता अशीच चालते. ते गिधाडही मृत्यूशी झुंजणार्‍या बालकामध्ये आपला घासच शोधते आहे ना? मग वाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन किंवा त्याचे प्रक्षेपण करणारे; त्या टपलेल्या गिधाडापेक्षा वेगळे आहेत काय? अशी ज्यांची गिधाडे होतात, ती माणसेच राहिलेली नसतात. मग त्यांनी माणुसकी, मानवाधिकार वा मानवी संस्कृती-सभ्यतेवर बोलावे का? छायाचित्रातले गिधाड आणि कॅमेरा घेऊन धावणारे वाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्या अभिनिवेशात तसूभर फ़रक दिसतो का? दुसर्‍याच्या वेदना, यातना, दु:ख यात आपला स्वार्थ शोधणारी वृत्तीच गिधाड असते ना?

२ टिप्पण्या:

  1. भाऊ गिधाडे वाढत चालले आहेत. परवा डोम्बिवलीला महिला कंडक्टरला एक गुंड मारत असतानाही कोणीही तीला वाचवण्यास पुढे आला नाही हे त्याचेच द्योतक आहे.

    उत्तर द्याहटवा